हे काय होतय मला ? चालण्याचा प्रयत्न करतीये पण चालू शकत नाहीये, खरं तर चालण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये कारण समोर कुठली वाटच दिसत नाहीये.
समोर धुकं आहे आणि फक्त शांतता. मी हि शांत आणि पूर्ण जग शांत झालाय अचानक. असं का झाला असावं ?
कश्याची पण भीतीच राहिली नाहीये, मी फक्त शांत उभी आहे, पुतळा झालाय माझा.
खूप वेगाने धावत धावत इथे पोचले , जरा वेळ विश्रांती घेईन म्हणून डोळे मिटले, पण आता बघते तर काय, समोर काहीच कसं दिसत नाहीये ?
मला पुन्हा वेगाने धावायचय, पण कुठे धावू ?
मी भूतकाळ आणि भविष्य काळ सगळंच विसरून वर्तमान काळ मध्ये रमलीये का ?
जर हो, तर हे चुकीचं आहे का ?
वर्तमान काळ थोडं जगायला लागलीये, जरा हसायला लागलीये, ते निरागस मज्जा करणारं माझ्यातलं बाळ जिवंत होऊ पाहताय आणि मग, मग येतीये ती भीती, खूप काही गमावून बसण्याची भीती , मागे राहून जाण्याची भीती. अस्वस्थ करणारी शांतता आहे हि.
खरं सांगू एवढी शांतता नाही आवडत मला.
होईल ना सगळं ठीक, दिसेल ना मार्ग ?