आता प्रेम आणि दूध, काय संबंध ?
जरा deeeep मध्ये जाऊन विचार करूया.
प्रेम कधी खूप उतू जातं, तर कधी आटत जातं . म्हणजे हे माझं स्टेटमेंट नाहीये, नुसता एक विचार आहे.
म्हणजे पहा ना, एके काळी दोन व्यक्ती खूप close असतात आणि दुसऱ्या क्षणी काही तरी प्रकृती चे खेळ होतात आणि नातं तुटतं.
नातं तुटलं म्हणजे प्रेम पण नाहीस होतं का ? ते आटत का ? जर हो , तर तुम्हाला मुळात प्रेम हे कॉनसेप्टच कळलं नाहीये!
तर conclusion काय ? प्रेम आणि दूध काही एक संबंध नाहीये.
अजून एक, प्रेम ही एक खूप नाजूक गोष्ट आहे, ती भावना जपायची असते, त्यात जर तुम्ही डोकं लावताय की OMG असं करायला नको , तसच वागूया , एवढच नको, तेवढच बोलूया - तर पुन्हा " नाही कळलं तुम्हाला प्रेम ".
जर तुम्ही विचार करून प्रेम करत असाल तर राव कसलं हो तुमचं प्रेम ? ठेवा आपल्या खिश्यात !
अरे एका स्वतंत्र पाखरू सारखं झेप घेऊ द्या प्रेमाला, नका लावू बंधनं.
बंधनं लावलीत की पाखरू ची घुसमट होते आणि पंख कापली जातात , मग कधीच ते पाखरू झेप घेण्याचा विचार सुद्धा करत नाही.
No comments:
Post a Comment