मागच्या दिवाळी च्या सुट्टीत घरी जाता आलं नाही, हॉस्टेल मधेच थांबावं लागलं कारण प्रोजेक्ट्स करायचे होते . पण काहीच मना सारखं होत नव्हतं. खूप depressed feel होत होतं, वाटायचं आपल्याने काहीच होऊ शकणार नाही. मग डिनर साठी मेस मध्ये गेले, बघते तर काय ? ती साधारण जेवण देणारी लोकं ज्यांची financial condition काही खूप छान नाहीच आहे तरीही ती लोकं किती खुश होती. त्या क्षणी वाटलं आपल्या कडे जे आहे ते त्यांच्या कळे नसून हि ती जर खुश राहू शकतात तर मी काय म्हणून दुखी आहे ?
प्रॉब्लेम काय आहे ना, आपल्या कळे जी गोष्ट असते त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही आणि इथेच चूक होते. कुठे धावतोय आपण आणि कशाला ?
तुम्हाला माहिती आहे का ? जगात प्रत्येक गोष्टी चं कौतुक होऊ शकतं. अगदी तुंहाला जी गोष्ट frustrate करते तिचं सुद्धा. पण आपण ज्या जागी आता उभे आहोत, त्या गोष्टीचं कौतुक आपण कधी करतो का ?
त्याला विचारा कौतुक ज्याचं स्वप्न आहे तुम्ही जिथे उभे आहात तिथे पोहचणं आणि तुमचं काय तर म्हणे मला अजून कुठेच तरी जायचंय. अरे हो जा कि, पहा ना स्वप्न अगदी आकाशाला स्पर्श करणारी, पण जरा वेळ थांबा आणि पहा अवती-भवती , हे पण तितकच सुंदर आणि अविश्वसनीय आहे :)
जर तुम्ही कृतज्ञ नसाल तर कधीच समाधानी होऊ शकणार नाही. काय ?
No comments:
Post a Comment