Asach aapla kahitari

Asach aapla kahitari
:)

Sunday, 21 August 2016

बरं वाटलं

आज असाच एक होम मिनिस्टर चा एपिसोड पाहत होते, त्यात एक नवीन जोडपं आलं होतं.
त्यांचं नुकतच love marriage झालं होतं. ह्या जोडप्याचं वैशिष्ठ म्हणझे मुलगी मराठी आणि मुलगा ख्रिस्ती (Christian).

बांदेकर मुलीच्या वडिलांना विचारतात तुम्ही कसकाय लावून दिलं ह्यांचं लग्न जेव्हा मुलगा ख्रिस्ती आहे ?
त्यावर त्यांचं उत्तर होतं - 
" मी धर्म - जात असल्या कशातही मानत नाही , कारण मी एक शिक्षक आहे .
 दोघे हि एकमेकांच्या अनुरूप आहेत ते महत्वाचं वाटतं मला. "

किती मोठी गोष्ट आहे हि .
As a  profession  कोणी हि शिक्षक होऊ शकतं हो, पण विचाराने आणि कृतीने जर शिक्षक होता आलं तर जग खूप सुंदर होईल .
हो ना ?

ऐकून फार बरं वाटलं!

No comments:

Post a Comment